युटोपियन सोशालिस्ट; रॉबर्ट ओवन
एकोणविसाव्या शतकात युरोपातील स्थिती अत्यंत दयनीय झाली होती. नेपोलियनसोबत नुकत्याच झालेल्या युद्धाची झळ सर्वदूर पोहोचली होती. सामान्य नागरिक अत्यंत हलाखीचे दिवस जगत होते. त्यातच माल्थसने भाकीत केलेली जागतिक आर्थिक मंदी खरोखरच सुरू झाली. बेरोजगारी प्रचंड वाढली आणि त्यासोबत हिंसाचाराच्या घटनासुद्धा. औद्योगिक क्रांतीची नुकतीच सुरुवात झाली होती. त्यादरम्यानच भांडवलदारांनी स्वतःचा फायदा वाढविण्याकरिता नवनवे कायदे आणले ज्यामुळे …